राजोरे विविध सोसायटीवर उसधारी शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील राजोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गिरधर काशिनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील उसधारी शेतकरी पॅनलचा १२ पैक्की१० जागा जिंकून दणदणीत विजय झाला आहे.

यावल तालुक्यातील राजोरे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितच्या पार पडलेल्या २०२२ ते २०२७या पंचवार्षिक कार्यकाळासाठी संपन्न झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ पदधिकारी गिरधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उसधारी शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील विजय उमेदवार गिरधर काशिनाथ पाटील , मनोहर रामदास भारंबे, प्रभाकर लक्ष्मण महाजन , भुषण धनराज नेहते , अंनत रामकृष्ण नेहते , गोपाळ काळु महाजन , दिवाकर इच्छाराम महाजन , इतर मागासवर्गीय गटातून सुभाष जगन्नाथ महाजन तर अनुसुचित जाती / जमाती या गटातून शहादु हरचंद्र काकडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर महीला राखीव गटातून मिराबाई मनोहर झांबरे आणि योगिता प्रभाकर पाटील या निवडून आल्या आहेत . या संपुर्ण निवडणुक प्रक्रीयेत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस. एस. शिंदे हे होते. यावेळी नवनिर्वाचित सर्व संचालकांचे गिरधर पाटील यांनी स्वागत सत्कार केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: