राजनंदिनी फाऊंडेशन आणि काबरा फाऊंडेशनतर्फे कोरोना योध्दांचा सत्कार (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील राजनंदिनी फाऊंडेशन आणि काबरा फाऊंडेशनतर्फे कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता, आरोग्य, वर्ग चारचे कर्मचारी, दुर्लक्षित वंचित घटक यांचा सन्मान मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

शहरातील राजनंदिनी फाऊंडेशन आणि काबरा फाऊंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. विनय काबरा, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, प्रविण पाटील, डॉ. ममता काबरा, डॉ. महेंद्र काबरा, प्रा. संगिता गावित, समित पाटील, राजनंदिनी फाऊंडेशनचे अध्यक्षा संदीपा वाघ यांची उपस्थिती होती.

यांचा केला सत्कार
सुरक्षा अधिकारी गजानन सुर्यवंशी, प्रकाश पाटील, स्वच्छता अधिकारी अजय जाधव, रुग्णांना जेवण वाटप करणारे रुकसार सय्यद नूर, मयूर महाजन, विजय खैरनार, सुरक्षारक्षक रोहित पवार, दिलीप सोनवणे, स्वच्छता अधिकारी जितेंद्र करोशिया, यश जाधव, सनी चांगरे, पवन सारवान, कुमार टाक, विकास चावरे, लक्ष्‍मण तंबोली, सागर बिऱ्हाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा करणाऱ्या म्हणून सत्कार करण्यात आला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.