‘राजगृह’ वर भ्याड हल्ल्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; राष्ट्रवादीसह समाजबांधवांची मागणी

शेअर करा !

धरणगाव, प्रतिनिधी । मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान ‘राजगृह’ वर भ्याड हल्ल्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांच्यासह समाजबांधवानी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

store advt

धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यावर झालेल्या भ्याड, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. हे कुकृत्य केवळ भारतीय सभ्येतेसाठी नव्हे तर लोकशाहीसाठी घातक आहे. असे कृत्य करणाऱ्यास भर चौकांत फाशी द्या अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या निवेदनांवर निलेश चौधरी, संभाजी कंखरे, सीताराम मराठे, आनंद पाटील, गोपाल पाटील, भूषण पाटील, मोहन पाटील, राजू शेख आदींच्या स्वाक्षरी आहे. तर गौतम नगरमधील समाजबांधवांनी हल्ले खोरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या निवेदनांवर दीपक वाघामारे, विवेक बाविस्कर, जितू शिरसाठ, मयूर भामरे, जितेंद्र वानखेडे, शुभम सोनवणे, दिपक सोनवणे, किरण सोनवणे, अजय मोरे, संतोष आखाडे, रवींद्र मोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!