राजकीय हेतूनेच माजी मंत्री खडसे आणि खा.राऊत यांचे फोन टॅप

  कुलाबा पोलिसांकडून महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एखाद्या राजकीय पक्ष किंवा त्याच्याशी संबधीत व्यक्तीच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे आणि खा.संजय राऊत यांचे मोबाइल फोनचे संभाषण टॅप केले असावेत, अशी शक्यता कुलाबा पोलिसांकडून महानगर दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात वर्तवण्यात आली आहे.

तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर खा. संजय राऊत तसेच राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाइलचे संभाषण टॅप केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात खडसे व राऊत यांच्या मोबाइल फोन टॅप करण्यात सहभाग असल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रश्न केला होता. यावर रश्मी शुक्ला यांनी काहीही उत्त्न्र न देता अभिवेक्षण हे मुख्य गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे काम असल्याचे नमूद केले आहे.

खडसे यांच्या मोबाइल क्रमांकांचे बेकायदा मोबाइल अभिवेक्षणासाठी विशेष कारण देण्यात आले नसले तरी राऊत यांच्या मोबाइलचे अभिवेक्षण करण्यासाठी या विशेष अधिकाराचा वापर करण्यात आल्याचेही मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले असल्याचे नमूद आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी शुक्ला यांना समज देण्याचा प्रयत्न केला असल्याचाही या अधिकाऱ्यांचा जबाब या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला असून या संदर्भात राज्य सरकारतर्फे समिती नेमण्यात येऊन त्याची सखोल तपासणी केल्याचा अहवालचा समावेश या आरोपपत्रात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!