रविकांत तुपकर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी रवाना

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी |  हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले असून सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत चर्चेची तयारी दाखवली आहे. दरम्यान, श्री. तुपकर यांनी बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली नाहीतर आंदोलनावर ठाम असल्याचे म्हटले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर निमंत्रित केले आहे. दुपारी अडीच वाजता रविकांत तुपकर व शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रविकांत तुपकर पनवेल येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलन संपले नाही, या बैठकीत काय निर्णय होतो यावर होतो ते पाहू. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली तर ठिक अन्यथा आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. आंदोलनाची पुढील दिशा मुख्यमंत्री यांच्या सोबतच्या बैठकीसाठी नंतर ठरणार आहे.  या आंदोलनाने सरकार हादरले आहे. सर्वांचे लक्ष आता या बैठकीकडे लागून आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content