रमजीपूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रतिभा महाजन यांची निवड

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रमजीपूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रतिभा पांडुरंग महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर व्हाइस चेअरमनपदी मुबारक तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

 

नुकत्याच झालेल्या रमजीपूर (ता रावेर) येथील विकास सोसायटीच्या पंचवर्षीक निवडणुकीची धुरा इतिहासात प्रथमच एका महीलेकडे गेली आहे. चेअरमनपदी प्रतिभा महाजन तर व्हाइस चेअरमनपदी मुबारक तडवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी विकास सोसायटीचे सदस्य विठ्ठल महाजन, विनोद महाजन, ज्ञानेश्वर पाचपोहे, दिलीप कावडकर, अंबादास महाजन, वासुदेव महाजन, काशिनाथ महाजन, काशिनाथ प्रजापती, वंदना महाजन, गोंडु महाजन, अमोल पाटील यांची उपस्थिती होती. तर योगिता मंगल कावडकर उपसरपंच रमजीपुर, मंगल कावडकर, रामकृष्ण महाजन, गोविंदा महाजन, देवीदास कावडकर, देविदास महाजन, रघुनाथ महाजन, अर्जुन महाजन यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content