युवा ब्रिगेडियर फाउंडेशनतर्फे विक्रमी लसीकरण

जळगाव, प्रतिनिधी । येथील काशीबाई उखाजी कोल्हे लसीकरण केंद्रावर विक्रमी असे एकाच दिवशी १६३९ जणांचे लसीकरण करण्यात आले.

 

कवयित्री बहिणाबाई मल्टीपर्पज संचालित युवा ब्रिगेडियर फाउंडेशन व  मनपाच्या संयुक्त विद्यमाने काशीबाई उखाजी कोल्हे लसीकरण केंद्रचालविण्यात येत आहे.  या केंद्रावर ८  सप्टेंबर रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी १६३९  जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली.  वैद्यकीय अधिकारी  डॉ. कल्याणी मिसाळ यांनी नेतृत्वाखाली सिस्टर देवयानी नेमाडे, भाग्यश्री सूर्यवंशी, अर्चना गवळी, वैशाली वंजारी, मंगला दायमा, आशा कर्मचारी छाया भालेराव, पल्लवी चौधरी, रुपाली चौधरी, अर्चना पाटील, सुनिता सोनवणे, वैशाली बारी, ज्योती पाटील,मेघा अहिरे, सरिता राऊत, मनीषा विधाते यांच्या पथकाने  कामकाज पाहीले.  याप्रसंगी युवा ब्रिगेडियर फाऊंडेशनचे पियुष कोल्हे , सागर बोरोले,  हितेश काळे, अक्षय महाजन, मृणाल राणे यांचे सहकार्य लाभले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!