युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घ्यावेत

आ. किशोर पाटील यांचे आवाहन

 

पाचोरा, प्रतिनिधी । युवक हेच परिवर्तनाचे खरे शिलेदार असून युवासैनिक हेच आपले ऊर्जास्रोत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे आजही सळसळता उत्साह निर्माण करणारे असून ते विचार घरा – घरात पोहचवून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजउपयोगी उपक्रम हाती घेऊन जनसंपर्क वाढवावा व जे युवा कार्यकर्ते तालुका किंवा गावात संघटनेसाठी काम करण्यासाठी तयार असतील त्यांनीच नाव द्यावे व संघटना वाढीसाठी मदत करावी असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.

ते पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे गटातील प्रमुख युवा पदाधिकारी व कार्येकर्ते यांची नियुक्ती व पुनर्बांधणी बैठकीत बोलत होते. या बैठकीत गाव तिथे युवासेनेची शाखा, युवासेनेची पुनर्बांधणी, पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचार युवकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचविणे व त्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवून जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल हा या बैठकीचा उद्देश होता.

यावेळी जो संघटनेशी एकनिष्ठ असतो त्या पदाधिकारी व कार्यकर्त्याला १०० टक्के शिवसेनेत न्याय मिळतो. आम्हीही संघटनेशी ३० वर्ष एकनिष्ठ राहून इमान राखली म्हणूनच या पदावर आहोत असे जिल्हा परिषद शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, सागर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या बैठकीला वसंत पाटील, उपसरपंच सागर पाटील, भैया महाजन, विनोद राऊळ, अन्सार शेख, सोनू परदेशी, स्वरूप राजपूत, गणेश महाले, गणेश देशमुख, पियुष राजपूत, प्रवीण गढरी, शिवाजी ठाकूर, हर्षवर्धन पाटील, शरद पाटील, मयूर पाटील (निपाने), कडू पाटील, उमेश पाटील, अन्वर शेख यांसह नगरदेवळा – बाळद गटातील युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार रोशन जाधव यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.