युवासेनेची शिवसेना भवन मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जिल्ह्यातील युवसेनेच्या ८० पदाधिकाऱ्यांसह २०० कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला असून यापार्श्वभूमीवर आगामी रणनीती आखण्यासाठी मंगळवार दि. २६ जुलै रोजी  शिवसेना भवन, मुंबई येथे युवासेनेच्या पदाधिकारी यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आले आहे.

 

युवसेनेची मंगळवार दि. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन, दादर येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य या सह युवासेनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या मुख्य उपस्थिती राहणार आहे.  तरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवासेनेचे जिल्हा, उपजिल्हा आधिकारी, विधानसभा आधिकारी, तालुका आधिकारी, महानगर अधिकारी, शहर आधिकारी व युवासेनेच्या काम करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांनी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथे उपस्थितीत राहावे अशे आवाहन युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.