युवासेनातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा प्रदर्शन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवासेना व कॉलेज कक्ष तर्फे बाळासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शहरातील नेहरू चौक येथे बाळासाहेबांच्या १०व्या स्मृती दिवसानिमित्त भरविण्यात आले आहे.

या ठिकाणी छायाचित्र बघण्यासाठी जळगावकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण छायाचित्रांचा माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे. बाळासाहेबांचे जुने भाषण, त्यांच्या जीवन व कार्यावर आधारित पोवाडे, शिवसेना गीतांनी परिसर प्रसन्न झाल्याची अनुभूती जाणवली. प्रदर्शनाच्या यशश्वीतेसाठी युवासेना व कॉलेज कक्षाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content