नवी दिल्ली । जागतिक पातळीवर भारताला मिळत असणार्या समर्थनामुळे बिथरलेल्या चीनने भारताला पुन्हा एकदा खिजवले आहे. युध्द झालेच तर यात भारत पराभूत होणार असल्याचा दावा चीनी सरकारी मीडियात करण्यात आला आहे.
गलवान खोर्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच एकीकडे चीन शांतता दाखवत आहे तर दुसरीकडे सरकारी प्रसारमाध्यमे युद्धाबाबत बातम्या देऊन भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. मॉस्कोतील शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वे फेंग या नेत्यांमध्ये दोन तास वीस मिनिटे चर्चा झाली. त्यात सिंह यांनी परखडपणे भारताचे सर्व आक्षेप फेंग यांच्यापुढे मांडले. त्यानंतर शनिवारी चीनमधील ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तमानपत्रानं भारताली धमकी दिली. ङ्गसध्या सुरु असलेल्या सीमा वादामध्ये भारताला जिंकण्याची कोणतीही संधी नाही, आज घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल.
ग्लोबल टाइम्सने आपल्या संपादकीयमध्ये म्हटलेय की, चीनच्या ताकदीची भारताला आठवण करुन देतोय. त्यामध्ये सैन्याच्या ताकदीचीही समावेश आहे. भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नाही.
दरम्यान, दोन्ही देशांच्या सरंक्षणमंत्र्यामध्ये झालेल्या बैठकीत मार्ग निघेल. ही बैठक दोन्ही देशासाठी एक महत्वाची आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिथावणीखोर कृत्ये करू नयेत. नकारात्मक माहिती पसरवून वाद निर्माण न करता दोन्ही देशांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यावर भर देण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत. सध्याची परिस्थिती निवळणे गरजेचे आहे. तसे झाले तरच शांतता प्रस्थापित होऊ शकेल अशी मखलाशी देखील यात करण्यात आली आहे.