यावल शहर शिवसेनेच्यावतीने ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

यावल, प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज यावल शहर शिवसेनेच्यावतीने गोरगरीब आदीवासी कुटुंबांना अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.

आज यावल शहर शिवसेनेच्यावतीने सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातुन एक चांगले उपक्रम राबविण्यात आले. यावल शहर शिवसेना शाखेच्यावतीने शहरातील गोळीबार टेकटीवर मोलमजुरी करणारे अनेक आदीवासी कुटुंब वास्तव्यास राहत असुन, आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब नागरीकांना अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपप्रमुख शरद कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी, मयुर खर्चे, शिवसेना आदीवासी विभागाचे तालुका प्रमुख हसन तडवी, पप्पू जोशी, संतोष खर्चे, किरण बारी, सारंग बेहेडे, सागर देवांग, योगेश राजपुत, योगेश चौधरी यांच्यासह सर्व यावल शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.