यावल शहरात महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी  ।  वाढत्या महागाईविरोधात जनजागृतीसाठी आज शहरात यावल तालुका काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली

 

देशात  सहा वर्षात नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्रातील सरकार हे सर्व पातळींवर निष्क्रीय ठरले आहे  घरगुती गॅस, पेट्रोल , डिझेलसह सर्वच जिवनावश्यक वस्तुच्या किमती गगनाला भिडल्या आहेत  नरेन्द्र मोदी यांनी सात वर्षापुर्वी सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखललेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिन ठरले

 

देशातील नागरीकांना जगणे कठीन झाले  आहे  मोदी सरकारची चुकीच्या व  उद्योगपतीधार्जिण्या धोरणामुळेच सामान्य लोकांचे जगणे कठीन झाले आहे  या  गोंधळलेल्या  शासनाच्या निषेधार्थ आज यावल शहरात काँग्रेसच्यावतीने महागाईविरूद्ध केन्द्र शासनाचा निषेध करण्यासाठी जनजागृती सायकल रॅली  काढण्यात आली

 

यावल जिनिंग प्रेसींग सोसायटीच्या आवारातुन निघालेल्या या सायकल रॅलीचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार रमेश चौधरी , जिल्हा परिषद गटनेते तथा कौग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील यांनी केले

 

नगरसेवक मनोहर सोनवणे , नगरसेवक असलम शेख , नगरसेवक समीर शेख ,गुलाम रसुल दस्तगीर , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह, कोरपावलीचे  सरपंच विलास अडकमोल, दहिगावचे  सरपंच अजय अडकमोल, बामणोदचे सरपंच राहुल तायडे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तार तडवी , नईम शेख , पुंडलीक बारी , अभय महाजन , उमेश जावळे , वढोदेचे  सरपंच संदीप सोनवणे , इम्रान पहेलवान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये भाग घेतला  या सायकल रॅलीचा समारोप यावल पंचायत समितीच्या आवारात झाला .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!