यावल शहरातील सर्व शिक्षकांच्या घरी जाऊन सत्कार

यावल,  प्रातिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी  शिक्षक दिनाचे औचित्य साधुन  शहरातील विविध भागात राहणारे गुरुजनांचे त्यांच्या घरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. 

 

नगरसेवक अतुल पाटील यांनी शहरातील साधारणपणे ७८ शिक्षकांना तथा सेवानिवृत्त शिक्षक शिक्षीकांना  सन्मानित केले,  त्या सन्मानित करण्यात आलेल्या गुरूवर्यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. यावेळी या अनोख्या शिक्षक सन्मान कार्यक्रमात  सामाजिक कार्यकर्ते एजाज देशमुख, हाजी फारुख मोमीन, गणेश महाजन, आशिष पाटील सर, शब्बीर तडवी, गणेश जोशी, मोसिन कुरेशी, भरत कोळी, प्रशांत पाटील, उदय पाटील यांनीसहभाग घेतला . अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या या सन्मानाबद्दल सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त करून त्यांचे आभार मानले. यावेळी अतुल पाटील यांचे गुरू तथा आदीवासी तडवी  भिल्ल एकता मंचाचे , महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. बी. तडवी सर यांनी आपले शिष्य अतुल पाटील यांनी केलेले कार्य हे अतुलनिय असल्याचे म्हटले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!