यावल येथे स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आधुनिक भारत निर्माता भारतीय क्रांतीचे जनक, पुर्व प्रधानमंत्री भारतरत्न  राजीव गांधी यांच्या ३२ वे पुण्यस्मरण  स्मृतीदिन साजरे करण्यात आले.

 

यावलच्या तालुका खरेदी विक्री सहकारी सोसायटी संघाच्या सभागृह परिसरात आयोजीत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शेतकी संघ यावल येथे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, यावलचे माजी नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर,माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष  शेख अस्लम शेख नबी, यावल शहर कॉंग्रेस कमेटीचे  उपाध्यक्ष अनिल जंजाळे,शहर उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष रहेमान भाई,नईम शेख, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,शेख सकलेन,टिनु सोनार, रामचंद्र भोईंटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहुन देशातील संगणक क्रांतीचे जनक व देशाच्या अखंडतेसाठी व एकात्मतेसाठी आपले बलिदान देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली वाहिली .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content