यावल येथे संगीतमय शिवलिलामृत अखंड सप्ताह

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील गंगानगर श्री गंगेश्वर महादेव मंदिर परिसरात १४ जानेवारी पासून सुरू असलेला संगीतमय शिव लिलामृत व अखंड सप्ताहात गेले ६ दिवसांपासून शिवलीला अमृत शनिवार संगीतमय शिवलीलामृत व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या सप्ताहात शंकर महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला.

या कथेची प्रवक्ते हरिभक्त परायण मनोज महाराज , दुस, खेडा तालुका यावल, हे चे वाचन करत आहेत. सहाव्या दिवशी शिवलीला अमृत मधील कथा वाचत असताना शंकर महादेव व पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शंकर-पार्वतीचे पात्र जम्मू काश्मीर येथे सैनिक म्हणुन देश रक्षणासाठी सेवेत कार्यरत असलेले दिगंबर माळी, गीता माळी त्याचा विवाह सोहळा पार पडला.

या सप्ताहात संजय महाराज, संजय जमादार, सूर्यभान जी महाराज शेळगावकर ,मनोज महाराज दुसखेडा त.यावल यांचे काल्याचे किर्तन सायंकाळी तसेच दिंडी सोहळा २१ रोजी तीन ते सहा होणार आहे व २२ रोजी तळी भरण्याचा कार्यक्रम व कर्पूरगौरा दर्शन . व त्यानंतर महाप्रसाद बारा ते तीन चे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील भावी भक्त व मंडळातील कार्यकर्ते, स्वप्नातील समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

 

Protected Content