यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा (व्हिडिओ)

यावल-अय्युब पटेल | येथे यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचा २३वा वर्धापनदिन पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 

यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आज शुक्रवार दि. १o जून रोजी पक्षाच्या स्थापनेचा २३वा वर्धापन दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ म्हणुन कार्य करणारे पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी दिनकर सिताराम पाटील , एम. बी. तडवी , पक्षाच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे या जेष्ठ पदधिकारी यांच्या हस्ते पक्षाचे ध्वज पुजन करण्यात आले व मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते , एम. बी. तडवी , मोहसीन खान, ललीत पाटील, युवकचे देवकांत पाटील, सुभाष फेगडे, महीला पदाधिकारी व्दारका पाटील, कामराज घारू,बापु जासुद, अय्युब खान सर , सरदार तडवी, विलास येवले, किरण पाटील, अॅड. निवृत्ती पाटील, जुनेद शेख नबी, मनोज येवले, प्रशांत चौधरी, महीला कार्यकारणीच्या तालुकाध्यक्ष प्रतिभा गुणवंत निळ, मोहराळा सरपंच नंदा गोपाळ महाजन, निलीमा विजय धांडे, ममता निलेश आमोदकर, ज्योती संतोष वैद्यकर, खुशाली जितेन्द्र जंगले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यक्रर्त मोठ्या संख्येत कार्यक्रमास उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!