नायगाव येथे आदिवासी बांधवांच्या सामूहिक विवाहाची तारीख निश्चित

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथे आदिवासी एकात्मीक प्रकल्प विभाग व कौमी एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक विवाह सोहळयाचे १५ मे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त इच्छुकांनी नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

यावल तालुक्यातील नायगाव येथील होणाऱ्या सामुहीक विवाह सोहळ्यात विवाह करण्यास इच्छुक वधु-वर पक्षातील मंडळी १५ मेच्या पुर्वी १०वे सामुहिक विवाह सोहळळयात आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. १०वे सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या कन्यादान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वधु – वराचा वयाचा किंवा जन्माचा दाखला , जातीचा दाखला , डोमिसाईल सर्टीफिकेट, बालविवाह कायदाचा व हुंडा कलमाचा भंग कुटुंबाकडुन होत नसल्याबाबतचे १०० रूपयांचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे. संपुर्ण आवश्यक कागदपत्रांसह १० मे २०२२पर्यंत वधु वरांच्या नांवांची नोंद करता येणार आहे. या सामुहिक विवाह कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने वधुला लग्न साडी, वराला ड्रेस आणि वधुवरांना राज्य शासनाच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग यावल यांच्या मार्फत कन्यादान योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच संसार उपयोगी भांडी व इतर साहित्य ही दिले जाणार आहे. या विवाह नोंदणीसाठी इच्छुकांनी समीर तडवी, कलिंदर तडवी, बाबू तडवी, कवी बी.राज, कुर्बान तडवी, बबलू तडवी, निसार तडवी, सचिन तडवी, मुबारक तडवी, फकिरा तडवी, सिराज तडवी, अरफान तडवी, लुकमान तडवी, रहेमान तडवी, सर्फराज तडवी, अजित तडवी, तसेच सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधवा असे आवाहन समाज बांधवाना कौमी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन तडवी व समस्थ आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!