यावल येथे माळी समाजातर्फे विविध कार्यक्रम उत्साहात 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील माळी समाज बांधवांच्या विविध सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥

लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥ मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥

सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४॥

असे श्री सावता माळी महाराजाच्या अभंगाने महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत यावल येथे दि. २७ जुलै २२ बुधवार रोजी महाराष्टातील वारकरी संप्रदयातील थोर संत श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजातील सामाजिक संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन संत सावता माळी समाज बहुद्देशीय मंडळ, माळी वाडा व्यासनगरी (यावल) यांनी केले होते.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुंदन फेगडे होते. या कार्यक्रमाचे शुभारंभ यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते संत सावता माळी महाराज यांच्या मूर्तीला पूजन करून करण्यात आले. या वेळी श्री व्यास महाराज मंदीर सभागृहात आयोजीत या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्याथ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी माळी समाज यावल शहर अध्यक्ष रमेश महाजन, उपाध्यक्ष सुभाष माळी, नारायण माळी, बाळू माळी, किशोर माळी, संत सावता माळी समाज बहुद्देशीय मंडळ यावल, महात्मा ज्योतिबा फुले युवा लेझीम मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, नाथ संप्रदाय भजनी मंडळी व गुणवंत विद्यार्थी तसेच पालकवर्ग आदींची कार्यक्रमास मोठया संख्याने उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.