यावल येथे महसूल दिनानिमित्ताने उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

शेअर करा !

यावल, प्रतिनिधी । येथे आज १ ऑगस्ट महसुलदिनानिमित्ताने महसूलमध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रावेर आणि यावलच्या अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

आमदार शिरिषदादा चौधरी , रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे , यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर, सौ. सुप्रिया थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले. दरम्यान यावल तहसील कार्यालयाच्या आवारात आज १ ऑगस्ट महसूल दिनानिमित आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन हे होते. याप्रसंगी यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर आणि रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह महसुलच्या २२ आधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान पत्राद्वारे गौरविण्यात आले.

store advt

यांचा करण्यात आला गौरव

सुरेश रामदास तायडे ( कोतवाल, यावल), महेन्द्र उल्हास चौधरी (कोतवाल, रावेर ), बाळु काळु पाटील ( शिपाई, यावल ) सुनिल मधुकर सोनार (शिपाई, यावल ), रावेरचे नायब तहसीलदार संजय उर्खड्ड तायडे, राहुल बी सोनवणे (निवडणुक नायब तहसीलदार, रावेर ), फैजपुरप्रांत कार्यालय नायब तहसीलदार, महेश यशवंत साळुंके , दादाराव विठ्ठलराव कांबळे (तलाठी ,रावेर ), लिना कुंदन राणे ( तलाठी, न्हावी यावल ), योगेश पाटील ( पोलीस पाटील, निंबोल रावेर ) सुयोग दिलीप पाटील ( लिपीक, यावल तहसील ) शिवकुमार लोलपे ( लिपीक, रावेर ) अमोल वासुदेव चौधरी ( लिपीक, प्रांत कार्या. फैजपुर ) पाटीलबा दाजीबा कडनोर( मंडळ अधिकारी, साकळी यावल ), प्रमोद भगवान टोंगळे ( मंडळ अधिकारी, ऐनपुर रावेर ), हर्षल विश्वनाथ पाटील ( पुरवठा निरिक्षक, रावेर ), रशीद आय तडवी ( अव्वल कारकुन, प्रांत कार्या. फैजपुर ), कलेश डी हातकर ( संगणक सहाय्यक, वनजमीनी प्रांत कार्या. फैजपुर ) यांचा उत्कृष्ट सेवाकर्मी म्हणुन यात समावेश करण्यात येवुन आज गौरवण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रस्तावीक तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी केले तर पाहुण्याचा परिचय व सुत्रसंचलन जे. डी. बंगाळे यांनी केले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!