यावल येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांशी साधला संवाद 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित नगर परिषदच्या निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात आला.

राज्यात लागलीच आगामी २०२२ काळात होवु घातलेल्या यावल नगर परिषदच्या पंचवार्षीक सार्वत्रीक निवडणूकी संदर्भात आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी पक्षाच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या मेळाव्यात कार्यकर्ता व नगर परिषदच्या निवडणुकीसाठी इच्छुक प्रभाग निहाय उमेदवार सोबत चर्चा करून यावल शहर काँग्रेस कमिटी कडे आलेले ५४ इच्छुक उमेदवारी फॉर्म तपासून वेट अँड वाच करा असे सांगितले.

यावेळी पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष कदीर खान, माजी नगरसेवक सय्यद युनूस सय्यद युसुफ, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, माजी नगरसेवक गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, माजी नगरसेवक करीम कच्छी, माजी नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, माजी नगरसेवक जाकीर शेख , माजी नगरसेवक समीर खान, काँग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, इम्रान पहेलवान, कालू मास्टर, नईम शेख, विक्की गजरे, रशीद मन्यार, शेख वासिम, आशफक शाह, शेख सकलेन, सईद शाह, जाकीर मेंबर, मिर रेहान सय्यद आदी कार्यकर्ता व पदाधिकारी या मेळाव्यात उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.