यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परीषदेच्या मराठी मुलांच्या शाळेत नुकतेच बाल आनंद मेळावा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजीत भालेराव व मुख्याध्यापक हेमंत बोरोले यांच्या हस्ते करण्यात आले, बालआनंद मेळाव्याचे आयोजन शाळेचे अध्यक्ष व सर्व शिक्षकांनी केले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखुमुक्तीच्या घोषणा दिल्या.
आनंद मेळाव्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते. या उपक्रमाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती होते. शिक्षणाची सुद्धा गोडी निर्माण होते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढत जाते, असे मुख्याध्यापक हेमंत बोरोले यांनी सांगितले. आज मराठी मुलांची शाळा पूर्ण दिवस दप्तरविना शाळा व महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होताना दिसून आला. या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष रणजित भालेराव, मुख्याध्यापक हेमंत बोरोले, आदिवासी आश्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक बोदडे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अहमद खान, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य छबु तडवी, अरमान तडवी, शिक्षक केतन महाजन, निशिकांत वायकोळे, छाया वायकोळे,सुनीता बोरोले, हाजी यू सुफ जनाब अली, मोहम्मद .फारुकी, जावेदआशिफ, जनाब सय्यद मुक्तार व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.