यावल येथे जिल्हा बँकेसाठी ८८.५८ टक्के मतदान

यावल, प्रतिनिधी I जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी यावल येथे ३३३ मतदारांपैकी २९५ मतदात्यांनी आपले हक्क बजावले आहेत. यावेळी ८८.५८ टक्के मतदान मतदारांनी केले आहे.

यावलात विविध विकास सोसायटी मतदार संघाचे ४८ मतदारांपैकी ४८ मतदारांनी तर इतर संस्थाच्या मतदार संघा मधील एकुण २८८ मतदारांपैकी २४७ अश्या दोन्ही संस्था मतदार संघाच्या ३३३ मतदारांपैकी २९५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावल येथील जिल्हा परिषदच्या ऊर्दू शाळेच्या मतदान प्रक्रिया राबविली गेली. केंद्रावर जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर उमेदवार, गुलाबराव देवकर , विद्यमान संचालक गणेश गिरधर नेहेते , रवींद्र पाटील , विद्यमान संचालक विनोदकुमार पाटील या मतदारांनी भेटी दिल्या. तसेच मतदान शांततेत पार पडले. या मतदानाव्दारे सहा उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर उमेदवारासह विविध पक्षाचे पदधिकारी हे उपस्थित होते. दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी होईल असी अशा व्यक्त केली आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!