यावल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण

यावल,  प्रतिनिधी । येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या वतीने आज ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 

वृक्षरोपण कार्यक्रमात उपवनसंरक्षक यावल वन विभाग एच. एस. पद्मनाभा, नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी,  सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्यासह  विशाल कुटे,   विक्रम पदमोर, आनंदा पाटील ,  आदीवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी यावल, ललित चौधरी , दिनेश पावरा , वनक्षेत्र यावल पुर्व, यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल, वनरक्षक, वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.  प्रस्ताविका व सुत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर  यांनी केले. तसेच कार्यक्रमात उपवनसंरक्षक पद्मनाभा एच. एस. , नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी  , विशाल कुटे ,मुबारक तडवी , आनंदा पाटील यांनी पर्यावरण विषयी उपस्थितांना आपले मार्गदर्शन केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.