यावल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांचा सत्कार

शेअर करा !

यावल, प्रतिनिधी । ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावल शहरातील तडवी कॉलनी येथे आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजन यावलच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या हस्ते करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

दरवर्षी जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत असतो. हा उत्सव पारंपरिक वाद्य वृंद वेशभूषा तथा आदिवासी नृत्य इत्यादी कार्यक्रमांचा यात समावेश असलेल्या मिरवणुकीने काढला जात असते. परंतु, देशात असलेल्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या नियमांची अमलबजावणी करीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून, मास्क लावून शांततेत हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाचे समाजीक कार्यकर्ते मुबारक फत्‍तु तडवी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ९ ऑगस्ट आदिवासी गौरव दिनाच्या औचित्य साधून आदिवासी एकता परिषद यांचेमार्फत तनवीर रशिद तडवी व व अंजुम रशिद तडवी वअरशिया मुबारक तडवी या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व व वृक्ष देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!