यावल, प्रतिनिधी | येथे इंटिग्रीटी फाउंडेशन, औरंगाबादतर्फे यावल व परिसरातील गरजूंना मोफत किरणा कीटचे वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात मिळावा व त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा या उद्देशाने इंटिग्रीटी फाउंडेशन, औरंगाबाद या संस्थेच्या वतीने गरजूंना किरणा कीटचे वाटप करण्यात आले. हे वाटप बुधवार २९ सप्टेंबर रोजी तडवी कॉलनीतील रहिवासी बुध्देश्वर पाटील यांच्यासह यावल शहरासह साकळी, डोंगरकोठारा व अंजळा या खेडेगावातील गरीब व गरजू ३७ कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. इंटिग्रीटी फाउंडेशन टीम लीडर रेनॉल्ड डॅनियल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ता बुध्देश्वर पाटील, रेव्ह शशिकांत वळवी, पत्रकार बाळासाहेब आढाळे, राजेंद्र आढाळे यांच्यासह गरीब, गरजू महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.