यावल येथे काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे आमरण उपोषण आश्वासनंतर स्थगित

यावल प्रतिनिधी । यावल येथे जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यावल तहसील कार्यालयासमोर सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती. महसूल विभागाच्या आश्वासनानंतर हे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

 

यावल तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. जिल्ह्यातील १० तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे व पीक विम्याचे पैसे मिळाले आहे. परंतू यावल तालुक्यावर अन्याय झाला असल्याने जिल्हा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी यावल तहसील कार्यालयासमोर सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आमरणे उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती. परंतू आमदार शिरीष चौधरी, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. याबाबत नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडविले.

यावेळी वढोदे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, पिंपरुडचे सरपंच योगेश कोळी, उमेश जावळे, शहराध्यक्ष नईमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस भूषण निंबायत, तलाठी मुकेश तायडे, कोतवाल धनराज महाजन, रामलाल कोळी, अकलुदचे ग्राप सदस्य अजय पाटील, सह शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content