यावल येथे आरोग्य शिबीर उत्साहात

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथे समता फाऊंडेशन मुंबई व लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित मोफत नेत्र तपासणी मोतिबिंदू शस्रक्रिया गर्भवती जोखमीच्या मातेची आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबीर उत्साहात पार पडले.

या शिबिराचा शुभारंभ रावेर यावल विधानसभा मतदारसंघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. शिबीराला तालुक्यातील गरजु रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला या आरोग्य तपासणी शिबीरात ज्या रुग्णांना डोळयात मोतिबिंदू असेल त्यांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे .

 

या शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या सोबत जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, व्ही.आर पाटील, एनएसयुआय चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, राष्ट्रवादी पक्षाचे यावल  तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, खरेदी विक्री सहकारी शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, हाजी शब्बीर खान , कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश सरचिटणीस जलील पटेल,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे, मारुळचे सरपंच सैय्यद असद भाई, माजी नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर, मनोहर सोनवणे, कॉंग्रेस कमेटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, माजी नगरसेवक असलम शेख नबी, समीर मोमीन, समीर खान यांच्यासह हर्षल बोरोले, नईम शेख, राजू करांडे, सकलेन शेख, विक्की गजरे, हाजी गफ्फार शाह, इम्रान पहेलवान, रहेमान खाटीक, अजय बढे, टेनू सोनार आदी मान्यवर उपस्थित होते

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content