यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महाविद्यालयातील एकूण १७ विद्यार्थ्यांना एक लाख चार हजार रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ एस पी कापडे, एन. एस. एस. प्रमुख प्रा. आर. डी. पवार, प्रा. डॉ.पी. व्ही. पावरा व तसेच कार्यक्रमाला उपस्थित होते.

आर्थिक दुर्बल घटकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी १३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे तर चार विद्यार्थ्यांना ६५०० प्रमाणे धनादेश वितरित करण्यात आला.

Protected Content