यावल तालुकांंतर्गत ग्रामसेवकांच्या बदल्या

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समिती यावलमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांच्या तालुका अंतर्गत तीन ग्रामसेवकांच्या बदल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड बोरसे यांच्या आदेशान्वये करण्यात आल्या आहे .

 

यावल पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील येणाऱ्या कार्यक्षेत्रात एकुण ८५ गावे असून, एकुण ४१ ग्रामसेवक या सर्व ग्रामपंचायतींचा कार्यभार सांभाळत आहेत. यातील तिन ग्रामसेवकपदाच्या जागा या रिक्त आहे तर पाच ग्रामसेवक हे पद्दोन्नतीच्या मार्गावर आहेत. यावल येथे कार्यरत असलेले प्रविण बळीराम कोळी यांची बदली भालशिव पिंप्री वरून कासवा ग्रुप ग्रामपंचायतवर करण्यात आली आहे तर भाईदास केशव पारधी ( ग्रामविकास अधिकारी ) यांची बदली अट्रावल वरून भालोद ग्रामपंचायतला झाली आहे. दिपक रमेश तायडे यांची विनंती वरून पिळोदे ब्रु॥ ग्रामपंचायतवर बदली करण्यात आली आहे.
कोरपावली तालुका यावल या ग्रामपंचायतीला अनेक दिवसापासुन ग्रामसेवक अभावी सर्वसामान्य नागरीकांची प्रलंबीत कामे व गावाचा चेहरामोहरा बदलणारी खोळंबलेली विकासकामांना चालना देण्यासाठी अखेर प्रभारी ग्रामसेवक म्हणुन वड्रीचे डी. एस. तिडके यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यांनी कोरपावली ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारला असता ग्रामसेवक डी. एस. तिडके यांचे सरपंच विलास नारायण अडकमोल, शाल व पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत केले, याप्रसंगी ग्रामसेवक प्रविण कोळी, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी , युवा समाजसेवक मुक्तार पिरण पटेल ,माजी सरपंच जलील पटेल , पिरण पटेल, क्लर्क किसन तायडे यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!