यावलच्या श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी बिनविरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँके यावलच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

 

बॅंकेचे अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते . त्यांच्या निधनानंतर बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर आज दिनांक २१ जून २०२३ रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत अट्रावल तालुका यावल येथील प्रगतीशील शेतकरी हेमंत एकनाथ चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 

बँकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या अध्यक्ष निवडीच्या सभेच्या बँकेचे अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक जे.बी. बारी हे होते . या सभेस सर्व संचालक मंडळाचे सदस्य व सीईओ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावल चे सहाय्यक निबंधक जे.बी. बारी यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत एकनाथ चौधरी यांनी यावेळी सर्व संचालक व कर्मचारी यांच्या सोबतीला राहुन सर्वांच्या सहकार्याने बँकेला प्रगती पथावर नेण्याचा विश्वास व्यक्त  केला .

Protected Content