यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या

सन२०२२-२०२३ या वर्षातील फेब्रुवारी/ मार्च २०२३ च्या एच एस सी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

यावलच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा ९९.१३% तर कला शाखेचा ७८.७८% तसेच किमान कौशल्य विभागाचा ८७.१०%निकाल लागलेला आहे.
यामध्ये विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.चव्हाण प्राजक्ता नरेंद्र हिने ८६.५०% मिळून प्रथम क्रमांक तर कु. नायसे प्राची राजू हिने ८२.५०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि पाटील गणेश पुना या विद्यार्थ्याने ८१.६६% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला तसेच कला शाखेतून कु. लहाने खुशी वसंत या विद्यार्थिनीने ७९.३३% मिळून प्रथम क्रमांक तर कु.सोनवणे नेहा संजय हिने ७१% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि कु. अढायगे दिक्षा दिलीप हिने ६८.८३% मिळून तृतीय क्रमांक मिळवला.
किमान कौशल्य विभागात कु.कोळी भाग्यश्री प्रकाश या विद्यार्थिनीने ६९.३३%गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु.भोई भाग्यश्री सुकलाल ६७.८३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु. तडवी सानीया सलिम व कु.चौधरी कविता युवराज यांनी ६७.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाचालक प्राचार्या संध्या सोनवणे, उपप्राचार्य, प्रा .एम.डी .खैरनार, उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सहकार्य करणार्या सर्व शिक्षकांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.