…म्हणून सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हती ; अंकिताने दिले स्पष्टीकरण

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतचे अंत्यसंस्कारावेळी यासाठी उपस्थित नव्हती कारण अशा अवस्थेत सुशांतला पाहू शकत नव्हती आणि हा तिचा स्वत:चा निर्णय होता, अशी प्रतिक्रिया सुशांतची मैत्रीण तथा अभिनेत्री अंकिता लोखंडेने दिली आहे.

store advt

 

सुशांतच्या अंत्यविधीला कलाविश्वातील मोजके कलाकार उपस्थित होते. अंकिता म्हणाली सुशांतला जर मी त्या अवस्थेत पाहिले असते तर मी कधीच विसरले नसते. म्हणून मी अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला होता. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर १५ जून रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशा्ंत आणि अंकिता जवळपास ६ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. करिअरची सुरुवात देखील दोघांनी एकाच काळात केली होती. दरम्यान, सुशांतला मी चांगले ओळखते. तो लढवय्या होता. तो कधीही आत्महत्या करूच शकत नाही, असेही अंकिताने आधीच सांगितले होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!