मोहराळा गावातून तीन लाखांचे सागवान लाकूड जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा गावात बेकायदेशीर सागवान लाकूडची कटींग करून विक्री करणाऱ्यांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली असून तीन लाख रूपये किंमतीचे सागवान लाकूड व साहित्या जप्त करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळा या सातपुडा पर्वताच्या पायथ्पाशी असलेल्या या गावातील अय्युब हसन तडवी यांच्या घरात कुठलेही परवानगीचे पत्र नसतांना बेकायद्याशीररित्या सुमारे दोन घन मिटर सागवानचे कट साईज केलेले ५६ नग लाकडाच्या पाटया व सुमारे ४० हजार रुपये किमतीची कटाई मशीन व २० हजार रूपये किमती मोटर यंत्रणा असा एकुण तिन लाख रूपये किमतीचे साहित्य जात करण्यात आले आहे.

 

वनविभागाचे धुळे विभागाचे वनसंरक्षक डी.पगार, जळगाव विभागाचे डीएफओ एच एस . पद्दमाभन, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पुर्व आणी पाश्चिम तसेच गस्ती पथकाच्या कारवाई केली. याप्रसंगी  पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी. मिलावे, पाश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, बी.वाय.नलावडे, वनसंरक्षक प्रमिला मराठे, सरला भोंगरे, गस्ती पथकाचे आनंदा पाटील, हरिपुरा क्षेत्राचे वनपाल आर.बी. पाटील, आर. पी. तायडे, वाय.डी. तेली, पोलीस हवलदार सचिन तडवी, वनपाल विलास पाटील, वनपाल योगेस सोनवणे, ए.एम. तडवी, वाहनचालक ईमाम तडवी यांच्यासह यांनी संयुक्त कारवाई केली. वनसंरक्षक धुळे डी डब्ल्यु पगार , सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश शिंदे यांनी आपल्या सर्व अधिकारी व वन विभागातील सर्व कर्मचारी यांचे या कारवाई सहभागा बदल कौतुक केले.

Protected Content