Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोहरम मिरवणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करण्यावर बंधन आली असून, मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

याचिकाकर्त्यांनी मोहरम मिरवणूक काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असं सांगत मागणी फेटाळून लावली. एखाद्या ठिकाणी मिरवणूक काढण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, असं सांगत याचिकाकर्त्यांना अलहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं.

देशभरात धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन बंधनं आणण्यात आली आहेत. दरम्यान, मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका लखनौ येथील याचिककर्त्यांनं केली होती.

या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले,” आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे,”

Exit mobile version