मोर्चा, आंदोलने करणाऱ्यांवर आता निर्बंध

जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिले हे नवीन नियम

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुक्यातील तहसील कार्यालय व विभागीय अधिकारी कार्यालयावर विविध संघटना व मोर्चासह आंदोलन करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी विशिष्ट निर्बंध लागू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय येथे दररोज विविध व्यक्ती / राजकीय संघटना / अराजकीय संघटना / मोर्चा काढून निवेदन देण्यात येत असतात. तथापि जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी विविध संघटनेमार्फत कार्यालयात येऊन मोठ-मोठ्याने घोषणाबाजी करून कार्यालयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माझे निदर्शनास आलेले आहे.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संबंधित सर्व पोलीस स्टेशन यांना खालील प्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत. विविध व्यक्ती / राजकीय संघटना / अराजकीय संघटना/समूह यांनी निवेदन देण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन येथे निवेदन दिल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक यांनी ज्या विभागास / कार्यालयास निवेदन देण्यात येणार आहे. त्या विभागाचे / कार्यालयाचे कार्यालय प्रमुख यांना किमान एक दिवस आधी कळविणे आवश्यक राहील, निवेदन देतांना मोर्च्यामध्ये सहभागी होणा-या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन त्या विभागात / कार्यालयात पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची दक्षता घेण्यात यावी, मोर्चा मधील केवळ ५ व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील, मोर्चा काढून निवेदन देतांना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील, कार्यालयातील कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्व सुचना देण्यात यावी, नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती / संघटना यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content