मोराडतांडा येथील विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण

पहूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मोराडतांडा येथील विवाहितेला मारहाण करून शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शनिवारी १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहुर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मोराडतांडा दिपाली विष्णू गोपाळ (वय-२३) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील विष्णू उत्तम गोपाळ यांच्याशी रीतीने वादनुसार झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतर काहीही कारण नसताना विवाहितेला शिवीगाळ करून जिवेठार मारण्याचे धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. तसेच सासरच्या मंडळींनी छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती विष्णू उत्तम गोपाळ, सासरे उत्तम भुरा गोपाळ, सासु जनाबाई उत्तम गोपाळ, शिवदास उत्तम गोपाळ, रोहिदास उत्तम गोपाळ, जेठ कृष्णा उत्तम गोपाळ, जेठणी ताराबाई कृष्णा गोपाळ, विठ्ठल उत्तम गोपाळ, पांडुरंग उत्तम गोपाळ, सरला पांडुरंग गोपाळ, नारायण उत्तम गोपाळ, सर्व रा. शिरपूर ता. धुळे यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत वीर नारायण करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content