यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आठवडे बाजारातून गर्दीचा फायदा घेत टोळीने नऊ जणांचे मोबाईल लांबविल्याची घटनासमोर आली होती. या गुन्ह्यात दोन महिलांसह एका तरूणाला जमावाने रंगेहात पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरात शुक्रवारी आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत तब्बल नऊ मोबाईल चोरी झाले होते तर सायंकाळी गर्दी मोबाईल चोरी करतांना श्रीराम सरेन चव्हाण रा. नागपूर यास जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या तरूणाकडे तपास केल्यावर त्याच्या सोबत असलेल्या लाखीनाबाई परशुराम राजपूत व गिताबाई टिल्लु राजपुत या दोन महिला असल्याचे त्याने सांगीतले. पोलिसांना तिघ संशयीत मोबाइल चोरटे आरोपीच्या विरूद्ध मोबाइल चोरीस गेलेल्या नागरीकांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघ महिला संशयीत आरोपींना देखील पोलीसांनी अटक केली. अटकेतील तिनही संशयित आरोपींना यावल न्यायालयात न्यायधिश एम.एस.बनचरे यांनी २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले व पोतीस करीत आहे.
यावल शहरातुन मागील एक वर्षा पासून विविध ठीकाणाहून अनेक नागरीकांचे मोबाइल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या असल्याने, या मोबाइल चोरट्यांना अटक झाल्याने नागरीकांमध्ये या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत आहे .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.