मोदी झिंदाबाद, जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून रिक्षा चालकास मारहाण ; दोघांना अटक

शेअर करा !

सीकर (वृत्तसंस्था) मोदी झिंदाबाद, जय श्री राम अशा घोषणा देण्यास नकार दिला म्हणून राजस्थानच्या सीकर येथे काही टवाळखोरांनी एका एका रिक्षा चालकाला मारहाण केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

 

राजस्थानच्या सीकर येथील कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय रिक्षा चालक गफ्फार अहमद कच्छावा हे गावातील प्रवासी सोडून परतत होते, तेव्हा जगमालपुरा आणि छोटी झीगर दरम्यान एका गाडीतून उतरुन २ जणांनी त्यांना मोदी झिंदाबाद, जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितल्या. कच्छावा यांनी घोषणा देण्यास नकार देताच त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गफ्फार यांचा डोळा सुजला आहे. तर दात तुटले आहेत. चेहऱ्यावर मारहाण केल्याचे निशाण दिसत आहेत. तसेच हल्लोखोरांनी त्यांचे घड्याळ आणि ७०० रुपयेही चोरल्याचा आरोप तक्रारीत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!