‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त मोदींसाठी शाहीन बागेत ‘लव्ह साँग’ आणि ‘सरप्राईज गिफ्ट’

shaheen bagh to pm modi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शाहीन बागेत या आणि आमच्यासोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करा. एवढेच नव्हे तर मोदींसाठी खास ‘लव्ह साँग’ आणि ‘सरप्राईज गिफ्ट’ तयार असल्याचेदेखील आंदोलकांनी सांगितले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे.

store advt

 

सीएए, एनआरसीविरोधात शाहीन बाग, झाकीर नगर, जामिया नगर आणि दिल्लीतल्या इतर भागांत डिसेंबरपासून आंदोलने सुरू आहेत. शाहीन बागेतल्या आंदोलकांनी नोयडा आणि आग्नेय दिल्लीला जोडणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. शाहीन बागेतील आंदोलकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने पंतप्रधानांना शाहीन बागेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. मोदींसाठी खास ‘लव्ह साँग’ आणि ‘सरप्राईज गिफ्ट’ तयार असल्याचेदेखील आंदोलकांनी सांगितले आहे. ‘पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या. तुमचे गिफ्ट घेऊन जा आणि आमच्याशी बोला,’ असा मजकूर असलेले पोस्टर्स शाहीन बाग परिसरात पाहायला मिळत आहेत.

error: Content is protected !!