धामनगाव बढे, प्रतिनिधी । मोताळा एआयएमआयएमपक्षाच्या तालुका अध्यक्षपदी आरिफखान बिबनखान पठाण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ए.आय.एम.आय.एम पक्षाचे अध्यक्ष असददुद्दीन ओवेसी यांचे निर्देशाने तर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार ईम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष गफ्फार कादरी, प्रदेश सरचीटणीस अब्दुल नाजिम, रियाजोद्दीन ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शहेजाद खान यांच्या सर्वानुमते धामनगाव बढे येथिल सामाजीक कार्यकर्ते आरिफ खान बिबन खान पठाण यांची मोताळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्यात. आगामी नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाची वेगळी ताकद उभी करुन विजयी उमेदवार सत्तेत उतारु नागरिकांच्या समस्यांचे निपटा-यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहू. पार्टीपक्ष हीत जोपासन्यासह पक्ष वाढीसाठी अहोरात्र जनतेचे काम करुन जनतेत एक आदर्श निर्माण करु असे नवनिर्वाचीत ता.अध्यक्ष आरिफखान यांनी याप्रसंगी सांगितले.