मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज राष्ट्रवादीचा स्थापना दिवस साजरा होत असतांनाच पक्षाला सुप्रीया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या रूपाने दोन कार्यकारी अध्यक्ष मिळाले आहेत.
अलीकडेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचे घोषीत केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर अनेक घडामोडी झाल्यानंतर अखेर त्यांनी अध्यक्षपदावर राहण्यास संमती दिली होती. यानंतर आज पक्षातर्फे खासदार सुप्रीया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात राज्यातील निवडणुकांची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर तर केंद्रीय निवडणुकांची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुपुर्द करण्यात आली आहे.
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज याबाबतची घोषणा केली आहे. शरद पवार यांनी या माध्यमातून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केल्याचे मानले जात आहे. तर या घोषणेनंतर अजित पवार यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.