जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव येथे रविवार २६ मार्च रोजी सागरी घारी पक्षाचे दर्शन झाले, अशी माहिती, पक्षी मित्र शिल्पा गाडगीळ व राजेंद्र गाडगीळ यांनी सोमवारी २७ मार्च रोजी दुपारी दिली आहे.
सागरी घारीला सफाई कामगार म्हणून ओळखळी जाते. यापूर्वी शिवाजीनगर,जळगाव परिसरात सागरी घारीची नोंद २०१९ मध्ये केली आहे. त्यानंतर आता रविवार, २६ मार्च रोजी तीन वर्षांनी मेहरूण तलावावर दर्शन झाले.
सागरी घार हा पक्षी आकाराने ४८ सेंमी, ब्लॅक काईट पेक्षा लहान, भारतीय उपखंडात बलुचिस्तान सोडून भारतात हिमालयातील १४००ते १८०० मीटर उंचीवर पर्यत, अंदमान बेटे आणि श्रीलंका येथील निवासी पक्षी असून अन्नाच्या उपलब्धतेनुसार स्थानिक स्थलांतर करतो. सागर किनारपट्टी,जमिनीवरील कालवे,तलाव अशा पाणथळ जागी उंच झाडांवर बसून भक्ष्य हेरातो अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.