मेहरुणमध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील मेहरूण परिसरामध्ये प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनेचे शिव संपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते लक्ष्मण वडले आदि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेहरुण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ येथे सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते लक्ष्मण वडले, गजानन चव्हाण, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेविका शबानाबी खाटीक उपस्थित होते.

यावेळेला पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, सदस्य नोंदणी अभियानामध्ये युवकांनी अधिक सहभाग घ्यावा असे आवाहन संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. प्रसंगी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन संपर्कप्रमुख संजय सावंत व इतर नेत्यांचे स्वागत केले.

यावेळी भुषण पाटील, श्याम कोगटा, विराज कावडीया, मानसिंग सोनवणे, शिवराज पाटील, मनीषा पाटील, शोभा चौधरी, अमित जगताप, केतन पोळ, विजय लाड, मिलिंद आंधळे, बंडू वाणी, कृष्णा पाटील, राजू पाटील, जब्बार शेख, सलमान खाटीक, गौरव घुगे, तेजस वाघ, कुणाल सानप, किरण नाईक, वैभव वाघ, एकनाथ वाघ, किरण दाभाडे, सुनील वंजारी, अमोल सानप, महेश घुगे आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!