मेडीकल दुकान फोडून रोकड लांबविली

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका रुग्णालयातील मेडीकल दुकान फोडून गल्ल्यातून तीन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील वात्सल्य बाल रुग्णालय हे डॉ. शिवाजी एकनाथ चौधरी यांचे आहे. या ठिकाणी डॉक्टरकीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन जणांनी रुग्णालयाचा खिडकीचा लॉक ब्रेक तोडून आत प्रवेश करत मेडिकल दुकानातील गुल्ल्यातून ३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात डॉ. शिवाजी चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहम्मद तडवी करीत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content