मुसळी येथे ट्रक्टरच्या टायराची चोरी; धरणगाव पोलीसात गुन्हा

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी येथील चालकाच्या वाहनाचे २५ हजार रूपये किंमतीचे टायर व स्टेपनी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास पाडूरंग पाटील (वय-४९) रा. मुसळी ता. धरणगाव जि. जळगाव हे वाहन चालक आहे. त्यांच्याकडे ट्रक्टर (एमएच १९ सीवाय १९१९) आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ट्रक्टरचे २५ हजार रूपये किंमतीचे टायर आणि स्टेपनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञातचोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण निकुंभ करीत आहे. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.