मुलीची आत्महत्या नसून पतीसह सासरच्यांनी केला घातपात; आईचा संतप्त आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दांडेकर नगरात करीना सागर निकम (वय १९) या तरूणीचे दहा दिवसांपुर्वी ११ जुलै २०२१ रोजी लग्न झाले होते. दरम्यान आज बुधवारी २१ जुलै रोजी सकाळी साडीने गळफास घेतल्याचे उघडकीला आले होते. यासंदर्भात  मयत करीना हिने आत्महत्या केला नसून तिच्यासोबत तिचे पतीसह सासरच्यांनी घातपात केल्याचा आरोप तिची आई सुलोचना समाधान भालेराव रा. खिरोदा ता.रावेर यांनी केला आहे. दरम्यान घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात माहेरच्या तसेच सासरचे नातेवाईक एकमेकांसमोर आल्याने गोंधळ उडाला होता. 

जळगाव शहरातील करीनाचे माहेरचे काही नातेवाईक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून मयत करीना हिचे खिरोदा ता. रावेर येथील आई सुलोचना भालेराव यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार सुलोचना ह्या दुपारी जिल्हा रुग्णालयात आल्या. याठिकाणी ठिकाणी त्यांनी आक्रोश करत तिच्या सासरच्यांनी तिला मारले असा आरोप केला. करीना हीची २००५ सालाची जन्मतारीख असून ती १५ वर्षाची आहे, तिचा लग्नाला नकार होता. या लग्नाबद्दल थेट लग्नाच्या दिवशीची माहिती मिळाली होती. तिला मारझोड तसेच दमदाटी करुन सासरे राजू निकम तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांनी जबदरस्तीने करीनाचा विवाह केला. करीना मरायला खूप घाबरत होती, त्यामुळे ती आत्महत्या करु शकत नाही, तिला सासरच्यांनीच मारले असल्याचा आरोप यावेळी मयत करीनाची आई सुलोचना हिने जिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!