मुलाला मोबाईलवर कळवत पित्याची आत्महत्या

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली खु. येथील पित्याने  मामाच्या घरी गेलेल्या मुलाला मोबाईलद्वारे संपर्क साधून आपण आत्महत्या करत असल्याचे कळवत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  या घटनेबाबत पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील रहिवाशी ईश्वर भिकन गोसावी (वय – ५७) हे शेतमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दि. १८ रोजी पत्नी व दोन मुले तारखेडा येथे मामाच्या घरी गेले होते. ईश्वर गोसावी हे घरी एकटेच असतांना आज दि. १९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश गोसावी यास त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला व सांगितले की, मी आत्महत्या करत आहे.  पित्याचे हे वाक्य ऐकुन गणेश याने त्यांना विनंती केली असे करु नका, तुम्हाला काय त्रास आहे ते सांगा. परंतु, ईश्वर गोसावी यांनी भ्रमणध्वनी बंद केला. त्यांनतर पत्नी व दोन्ही मुलांनी तात्काळ अंतुर्ली येथे धाव घेतली. अंतुर्ली येथे  दाखल झाल्यानंतर त्यांना घराच्या छताला ईश्वर गोसावी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी पत्नी व दोन्ही मुलांनी एकच आक्रोश केला. ईश्वर गोसावी यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.  ईश्वर गोसावी यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही.  शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहे. ईश्वर गोसावी यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुले, दोन मुली (विवाहीत) असा परिवार आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!