मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांचा जि. प. अध्यक्षांनी केला सत्कार

जळगाव, प्रतिनिधी ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार डॉ. बी. एन. पाटील यांना प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांचा  पुष्पगुच्छ सत्कार केला.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत कोरोना काळात देखील उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर जि.प.अध्यक्षा ना. रंजना पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील  यांचा सत्कार केला.  याप्रसंगी आ. राजूमामा  भोळे, जि. उपाध्यक्ष   उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदङे, जि. प. सदस्य मधु काटे, प्रताप पाटील,कैलास सरोदे, अमित देशमुख,तसेच सामाजिक कार्यकते प्रल्हाद पाटील,अतुल भालेराव,हरलाल कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.