मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, असे संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि खणन मंत्री एमआर निरानी यांचं नाव आघाडीवर आहे.

 

कर्नाटक भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल?; याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. मात्र अद्याप त्यावर अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही.

 

“नेतृत्व बदलावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आज संध्याकाळपर्यंत याबाबत सर्व चित्र स्पष्ट होईल. मी पक्षश्रेष्ठींकडून नावाची आशा करतो. तुम्हाला लवकरच याबाबत माहिती मिळेल. दलित मुख्यमंत्री नियुक्तीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. मला कोणतीच चिंता नाही”, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.

 

 

भाजपा पक्षश्रेष्ठींनी याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. २६ जुलै येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा शेवटचा दिवस असेल असं बोललं जात आहे. कर्नाटकच्या राजकारणात येडियुरप्पा यांचं वळय आहे. येडियुरप्पा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिकारीपुरातील पुरसभा अध्यक्षापासून केली होती. १९८३ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आठवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले.

 

२०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वाधिक ११० जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा पक्ष गाठू शकला नव्हता. त्यासाठी त्यांनी ६ अपक्ष आमदारांना गळ घातली होती. मात्र त्यांच्या जीवावर सरकार फार काळ टिकू शकणार नाही याचा अंदाज आल्याने जेडीएस आणि काँग्रेसकडे मोर्चा वळवला होता. याला ‘ऑपरेशन कमळ’ असं नाव देण्यात आलं होतं. सात आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यापैकी ५ जण निवडूनही आले होते. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

 

Protected Content